About

माझ्याबद्दल

“जीवनाच्या वळणावरती आले विसाव्याचे क्षण, आयुष्याची पन्नाशी गाठतांना झाले मी कार्यक्षम.”

             मी एक विवाहित हाऊसवाइफ आहे. माझा दिवस घरातील घरगुती कामे करण्यात व्यस्त असतो. माझे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
             मी लहानपणी खूपच अभ्यासू वृत्तीची होते. त्यामुळे मला नेहमी ओरडले जायचे, कि काय ‘ सदा न कदा’ पुस्तकात डोका घालून बसते. त्या वेळेस मला वाटायचे कि, मोठेपणी आपण कमीत कमी टीचर तरी व्हायचे. परंतु घरातील कौटुंबिक वादामुळे व पैशांच्या चणचणीच्या कारण माझे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. माझे वडिल माझ्या आई सोबत खूपच भांडण करायचे. एवढे भांडण मारामारी, तमाशे मी तर कुणाच्याच घरात अजूनपर्यंत तरी कधीच बघितले नाही. त्यामुळे घरात तर माझा अभ्यास होतच नव्हता, म्हणून मग मी क्लासच्या ऑफ पिरीयड मध्येच शाळेचा होमवर्क करत असे. माझा शाळेमध्ये तीसरा क्रमांक तर ठरलेला असायचा.
             आज मी वयाची पन्नाशी गाठत असतांना व मला थोड काही करायला मोकळा वेळ मिळत असतांना तसेच घरची आर्थिक स्थिती आणि अनेक घरगुती कारणांमुळे मी या वयात जे थोडफार काही करायची इच्छा जी अपूर्ण होती, ती काही प्रमाणात तरी पूर्ण होईल या कल्पनेत मी आहे. बघू या आता या प्रयत्नात मी किती सफल होते.
             तसेच या ब्लॉगचे जे शुभू नाव आहे ते मला लहानपणी इंग्रजी विषय शिकविणाऱ्या सरांनी दिले होते. मी इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची उत्तरे फटाफट इतक्या स्पिडमध्ये द्यायची मला तर वाटते माझ्यासारख अस कुणीच नसेल! म्हणून ते सर मला लाडाने शुभू बोलत असतील!
             लिहायला गेले तर माझ इंट्रडोक्शन खूपच लांबलचक आहे. क्षमा असावी मी जास्त अक्षरात माझ इंट्रडोक्शन दिल्याबदल! आभार आहे आपले माझ इंट्रडोक्शन विचारल्याबद्दल!

             धन्यवाद!

Check my guide for creators: strategies, stories, and tools to help you grow your craft.

Latest Posts