प्रत्येकाच्या जीवनाची कहानी वेगवेगळी असते. ज्या कुटूंबात माझा जन्म झाला, म्हणजे माझ्या वडिलांचे घराणे! जिथपासून मला ह्या घराण्याची माहीती आहे. तिथपर्यंत माहीती देण्याचा प्रयत्न मी माझ्या आत्मकथेमध्ये केला आहे. माझा जन्म भारतातील महाराष्ट्र जिल्ह्यातला. मी एका सामान्य कुटूंबात जन्मले! माझी आई गावातील व वडिल शहरातले. महाराष्ट्र हा मराठी भाषिक जिल्हा. शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज निर्मित महाराष्ट्र जिल्हा! मी पण मराठी असल्यामुळे माझ्या आत्मकथेचे वर्णन मी मराठी भाषेत करत आहे. माझ्या कहानीची सुरुवात होते, सन १९३५ च्या दशकापासून! आपल्या भारतावर त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते. आपला भारत देश इंग्रजांचा गुलाम होता . स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या. माझ्या वडिलांचे नाना हे तेव्हा इंग्रजांचे जेलर होते. ते जिथे राहत त्या कॉलनीमध्ये त्यांचा खूप दरारा होता.

त्याच्या नंतरचा काळ हा भारताच्या स्वातंत्र्याचा काळ होता. वडिलांचे मामा म्हणजे वडिलांच्या नानांचा मुलगा तेव्हा पाकिस्तानातल्या प्रांतात राहत होते. त्यावेळी वडिलांच्या नानांनी आपल्या मुलाला स्पेशल विमान पाठवून भारतात बोलावून घेतले . जर त्यांनी त्या वेळेस आपल्या मुलाला भारतात बोलावून घेतले नसते तर ते नेहमी करिता पाकिस्तानात राहून गेले असते. त्यांना आपल्या मुलाला कधीच भेटता आले नसते . कारण कि त्यानंतर आपल्या भारत देशाची भारत-पाकिस्तान अशी फाळणी झाली . अशाप्रकारे दूसरा देश पाकिस्तान ची निर्मिती झाली.

माझी आजी म्हणजे वडिलांची आई ही पतीच्या निधनानंतर स्वतःच्या वडिलांकडे राहायची. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीच्या सभा होत असता! त्या सभेमध्ये माझी आजी स्वतःच्या वडिलांसोबत जात असे , तेव्हा आजीने महात्मा गांधीना अगदी जवळून बघितले होते . त्यामुळे मी लहान असताना आजी मला सांगायची कि गांधीजीचे हात सामान्य माणसापेक्षा लांब होते. अशी व्यक्ति जगामध्ये खूप अजरामर होते.

वडिलांच्या नानांच्या मृत्यू पश्चात वडिलांच्या मामांनी नानांची बंदूक व तलवार भारत सरकारच्या स्वाधीन केली.

माझी आजी शिक्षणात खूप हुशार होती व शिकलेली होती. त्यामुळे आजीला शाळेमध्ये टीचरची नोकरी मिळाली होती. आजी ज्या शाळेत नोकरीला होती ती शाळा खूप फेमस होती. त्याकाळी सातवी पासला मॅट्रिक समजले जायचे. आजी सातवी पास असल्यामळे आजीला शाळेमध्ये टीचरची नोकरी मिळाली होती. त्या काळात विधवा स्त्रीने अशी नोकरीला जाणे, अतिशय त्रासदायक होते, कारण लोक अशा स्त्रीची हेटाळणी करायचे! म्हणायचे, ‘बघा विधवा बाई नोकरी करते!’ अशा नोकरी करणाऱ्या स्त्रीला चांगले लेखले जायचे नाही.

वडिलांचा जन्म झाला, तेव्हा वडिलांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे ते वडिलांबद्दलची कोणतीही गोष्ट किंवा माहीती सांगू शकले नाही. लहान असताना स्कॉर्लशिप मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षण झाले. अभ्यासात हुशार असल्यामुळे वडिलांनी बीकॉम पर्यंत शिक्षण घेतले . घरची आर्थिक परिस्थिती व नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी कॉमर्स निवडले. परंतु त्यांना इंटरेस्ट सायन्समध्ये होता. तसे तर वडिल सगळ्यांच विषयांत हुशार होते. जीवशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र, विज्ञान हे विषय पण त्यांच्या आवडीचे होते. कॉमर्स हा त्यांच्या आवडीचा विषय नव्हता, पण करिअर करायसाठी त्यांनी कॉमर्स हा विषय निवडला. स्कॉर्लशिप च्या भरवशावर त्यांनी स्वतःचे संपूर्ण शिक्षण केले.

वडिलांनी आयटीया केला होता . घरचा रेडिओ त्यांनी स्वतःच बनवला होता. त्यांचे इलेक्ट्रिकल काहीन काही इन्वेंशन टाइप चालू असायचे. नोकरी करित असल्यामुळे त्यांना अस काही करायला वेळ मिळत नव्हता. तेव्हा मी लहान होते, शाळेत शिकत होते. मी पण वडिलांसारखी अभ्यासात हुशार होते. एकदा वाचलेल माझ पूर्ण लक्षात रहायच. क्लास मध्ये माझा दूसरा किवा तिसरा नंबर यायचाच. परंतु गणितामध्ये मी थोडी कच्ची होते. कारण माझ्या डोक्यात गणिताचे सिद्धांत समजायचे नाही. मला गणित शिकविणारे जे सर होते ते गणित जास्त चांगल्या प्रकारे समजावून सांगायचे नाहीत. मला ट्युशन नव्हती, त्यामुळे पण मला गणित समजने कठीण होते. दूसरी मुले शाळेत, बाहेर, कुठे ना कुठे ट्युशनला जायची.

माझी घरची परिस्थिती तशी नव्हती. घरात आईवडिलांचे खूप वाद व्हायचे. भांडण व्हायची. त्यामुळे अभ्यास व त्याच्यात ट्युशन हे मी करूच शकत नव्हते. वडिलांचेही हेच म्हणने, असायचे ‘काय करायचय शिकून! पोरीचतर आहात तुम्ही? तुम्हाला काय शिक्षणाची गरज? तुम्हाला थोड़ी मोठे होऊन पोरांसारखी नोकरी करायचीय?’

ज्या कुटूंबात आईवडिलांचे खूप भांडण – वाद होतात, त्या मुलांचे जगणे हे त्यालाच समजते अशा परिस्थितीत जे वाढलेले व रहालेले असतात .

तसे, ‘तर भांड्याला भांड लागतेच’ असे बोलतात. भांडण ही सगळ्यांच्याच घरात असतात. पण फरक फक्त एवढा असतो की, कुणाच्या घरात भांडण ही कमी प्रमाणात असतात तर कुणाच्या घरी जास्त प्रमाणात होतात. अशी परिस्थिती जर असेल तर शिक्षण पण होऊ शकत नाही.

मला तरी असे वाटते की, किंवा माझे मत आहे की अशी परिस्थिती ज्यांच्या घरात असेल त्या मुलांचे शिक्षण हे अधूरे राहत असेल. कारण की मी हे सगळं अनुभवलेलं असल्यामुळे माझे अशी विचार आहे.

हिंदू धर्मामध्ये ही संस्कृतीच आहे की पतीकडून स्त्रीचा कितीही छळ झाला, तरी तो स्त्रीने सहन करायचा. यात तिला तिचे आईवडिलही लग्नानंतर काहीच मदत करित नाहीत व आपल्या मुलीला घरी घेऊनही जात नाहीत.

ही पूर्वापार चालत आलेली संस्कृति आहे म्हणे, की ‘स्त्रीने आपला शेवट मरेपर्यंत पतीच्या दारातच काढायला हवा’. एकदा मुलीच लग्न झालं की, पतीच घर हेच तिचं शेवटच घर!

घरातल्या अशा या किटकिटीच्या वातावरणामुळे मला शिकायची आवड असूनही माझे शिक्षण होऊ शकले नाही.

एकदा मी थोड़ी मोठे झाल्यावर मेडिकलला जात असताना, माझ्या क्लासमधली एक मुलगी भेटली व मला म्हणाली, की ‘मी जॉब करित आहे’. तु काय करिते? माझ्या क्लासमधली ती मुलगी माझी मैत्रिण नव्हती व क्लासमधील हुशार विद्यार्थिनी पण नव्हती. पण तरी ती जॉब करित होती व तिला सायकल सुद्धा येत होती. नंतर ती मला म्हणाली की ‘तु तर क्लासमधील एवढी हुशार मुलगी ‘? तु तर जॉब करत असेल! कशाला खोटं बोलतेस? त्यावर मी म्हणाले, मी तर घरीच असते. त्यानंतर ती निघून गेली.

मी लहान असतांना, माझ्या घरच्यांना , वडिलांना बाहेर खेळायला गेलेले आवडायचे नाही. दूसऱ्या लहान मुलींसोबत त्यांच्या घरी खेळायला जाणे किंवा आपल्या बरोबरीच्या मुलांसोबत खेळणे, बोलणे याचा राग यायचा वडिलांना! यामुळे मला लहानपणी सायकलही चालवायला मिळाले नाही. म्हणून मला सायकल सुद्धा चालवता आली नाही. स्कूटी चालवणे शिकणे ती तर त्याच्या पूढची गोष्ट आहे.

माझे वडिल खूपच स्ट्रिक होते. दुसऱ्यांचे वडील कसे मुलींना कोणतीही गोष्ट करायला फ्रीडम देता. माझे वडिल त्यातले नव्हते. वडिलांचे म्हणने होते की, तुम्हाला जर शिक्षण घ्यायचे असेल तर स्वतःच्या भरवशावर शिका. स्कॉर्लशिप घेऊन शिका. खूप अभ्यास करून शिका. ट्युशन लावणे म्हणजे चीटिंग करणे आहे. असे त्यांचे म्हणने होते. वडिल घरच्या गरीब परिस्थितीतून शिकले होते. स्कॉर्लशिप मिळवून व खूप अभ्यास करून शिकले होते. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीची त्यांना जाण होती. या कारणांमुळे मला गणित हा विषय अवघड जात असूनही ट्युशन लावता आली नाही. गणित या एकाच विषयाच्या कारण माझे शिक्षण हे अधूरे राहिले.

आजकाल तर यू ट्युबवर गणित हा विषय व विविध प्रकारचे गणित, त्यांचे सूत्र, त्यांची गणित सोडवण्याची पद्धत इतक्या चांगल्या व इझी पद्धतीने समजावून सांगतात कि ते लगेच डोक्यात घुसते. मग मी विचार करते की मी शाळेत शिकत असतांना सर लोक पण याप्रकारे समजावू शकत होते पण त्यांनी याप्रकारे गणित कधीच समजावून सांगितले नाही. यूट्युबवर लोकांना खूप सारा पैसा मिळतो, शिकवण्याबद्दल! म्हणूनच तर एवढ्या छान प्रकारे समजावून सांगतात. नाहीतर मी एक होते लहानपणी ना ट्युशन लावू शकत होते. फक्त गणित या एका विषयासाठी. नाहीतर मी शिक्षण शिकून किती पुढे गेले असते.

मी घरातील मोठी मुलगी असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टींची मनाई होती. तु इकडे नको जाऊ! तु हे नको करु? तुझ्या लहान बहीणी आहेत. त्या खेळतील, करतील. तु मोठी आहेस तु घरात राहा . काय जास्त मोठीपण नव्हते मी! १०/११ वर्षांची तर होते मी? या वयात तर मुलींमध्ये अल्हडपणा असतो. समज नसते. यामुळे मी बाहेर खेळायला जाणे बंद करून टाकले. बाहेर खेळणे नसल्यामुळे माझी उंची पण कमी राहून गेली. असे बोलतात की उंची ही अनुवांशिकतेवर असते पण आईवडील तर उंच होते तरी माझी उंची कमी राहीली. यामुळे माझा आनुवांशिकतेवर विश्वास नाही.

Leave a comment

Get the Book

The ultimate guide for creators: strategies, stories, and tools to help you grow your craft.

Be Part of the Movement

Every week, Jordan shares new tools, fresh perspectives, and creator spotlights—straight to your inbox.

← Back

Thank you for your response. ✨

Creator Rising: A Playbook for a Meaningful Creative Life is your guide to building
not only income, but a creative life
worth living.

Inside you’ll find systems for sharing your work, habits that fuel inspiration, and ways to grow without losing
the spark that makes you create in the first place.