नं – १) बळी तो कानपिळी.
नं – २) अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
नं – ३) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
नं – ४) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
नं – ५) जगा सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण.
नं – ६) केल्याने होत आहे रे आधि केलचं पाहीजे.
नं – ७) काखेत कळसा गावाला वळसा.
नं – ८) आपलं ते पोर दूसऱ्याचं ते कारट.
नं – ९) ऐकावे जनाचे करावे मनाचे.
नं – १०) खाली मुंडी पाताळ धुंडी.
नं – ११) तुला न मला घाल कुत्र्याला.
नं – १२) दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
नं – १३) मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
नं – १४) दे दान सुटे गिरान.
नं – १५) घर पहावे बांधून व लग्न बघावे करून.
नं – १६) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.
नं – १७) आयत्या बिळात नागोबा.
नं – १८) आवळा देऊन कोहळा काढणे.
नं – १९) आपलेच दात आपलेच ओठ.
नं – २०) वराती मागून घोडे.
नं – २१) घरोघरी मातीच्या चुली.
नं – २२) आधी पोटोबा मग विठोबा.
नं – २३) दूरून डोंगर साजरे.
नं – २४) इन मीन साडेतीन.
नं – २५) उचलली जीभ लावली टाळ्याला.
नं – २६) आलीया भोगासी घेतलीया अंगासी.
नं – २७) स्वतः वरून जग ओळखावे.
नं – २८) झोपी गेलेला जागा झाला.
नं – २९) तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे.
नं – ३०) खाई त्याला खवखवे.
नं – ३१) अगं अगं म्हशी मला कुठ नेशी.
नं – ३२) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
नं – ३३) खाल्ल्या मिठाला जागणे.
नं – ३४) दाम करी काम बीवी करी सलाम.
नं – ३५) शोधा म्हणजे सापडेल.
नं – ३६) नाकापेक्षा मोती जड.
नं – ३७) देव देतं अन कर्म नेतं.
नं – ३८) शहाण्याला शब्दांचा मार.
नं – ३९) जुनं ते सोनं.
नं – ४०) बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
नं – ४१) पेरालं ते उगवेल.
नं – ४२) बाप तसा बेटा.
नं – ४३) पालथ्या घड्यावर पाणी.
नं – ४४) इकडे आड तिकडे विहीर.
नं – ४५) लेकी बोले सुने लागे.
नं – ४६) हातच्या कंकणाला आरसा कशाला.
नं – ४७) शेरास सव्वाशेर.
नं – ४८) पळसाला पाने तीनच.
नं – ४९) दैव देतं कर्म नेतं.
नं – ५०) असतीलं शिते तर जमतीलं भुते.
नं – ५१) लहान तोंडी मोठा घास.
नं – ५२) जुनं ते सोनं.
नं – ५३) यथा राजा तथा प्रजा.
नं – ५४) भिंतीला कान असतात.
नं – ५५) निंदकाचे घर असावे शेजारी.
नं – ५६) नाचता येईना अंगण वाकडे.
नं – ५७) हाजीर तो वजीर.
नं – ५८) धरलं तर चावतय.
नं – ५९) शितावरून भाताची परीक्षा.
नं – ६०) ताकापुरते रामायण.
नं – ६१) चोराच्या उलट्या बोंबा.
नं – ६२) खायला काळ अन् भुईला भार.
नं – ६३) गाढवाला गुळाची चव काय?
नं – ६४) चोराच्या मनात चांदणे.
नं – ६५) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.
नं – ६६) गरज सरो वैद्य मरो.
नं – ६७) खान तशी माती.
नं – ६८) कानामागून आली अन् तिखट झाली.
नं – ६९) अती तिथे माती.
नं – ७०) एकाच माळेचे मणी.
नं – ७१) झाकली मूठ सव्वा लाखाची.
नं – ७२) गाढवाला गुळाची चव काय?
नं – ७३) थेंबे थेंबे तळे साचे.
नं – ७४) देव तारी त्याला कोण मारी?
नं – ७५) गर्वाचे घर खाली.
नं – ७६) ऊस गोड लागला म्हणून मूळासकट खाऊ नये.
नं – ७७) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.
नं – ७८) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.
नं – ७९) काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
नं – ८०) खऱ्याला मरण नाही.
नं – ८१) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
नं – ८२) देश तथा वेश.
नं – ८३) एक ना धड़ भाराभर चिंध्या.
नं – ८४) ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे.
नं – ८५) चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे.
नं – ८६) अंथरूण पाहून पाय पसरावे.
नं – ८७) बुडत्याला काठीचा आधार.
नं – ८८) कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच.
Leave a comment