उपवासाची शेगदाणा आमटी
साहित्य : – शेंगदाणे, तेल, मीठ, जिरा, आल, कोथिंबीर, पाणी, हिरवीमिरची.
कृती :- एक लहान वाटीभर शेगदाणे घ्या. पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर गॅसवर शेगदाणे भाजून घ्या. भाजल्यानंतर थंड होऊ द्या. शेगदाणे थंड झाल्यानंतर सुपात पाखडून घ्या. त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची घ्या. नंतर आल्याचा एक छोटा तुकडा घ्या. दोन ते तीन कोथिंबीरच्या काड्या घ्या. एक लहान चमचा जिरा घ्या. हे सर्व साहित्य व आपल्या अंदाजानुसार थोडं मीठ घेऊन मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
गॅस ऑन करून पातेलं ठेऊन त्याच्यात थोडं एक लहान चमचा तेल टाकून घ्या. तेल तापल्यानंतर त्याच्यात चिमूट भर जिरं टाकून घ्या. जिरा थोडं ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यात मिक्सरमध्ये बारीक केलेलं साहित्य टाकून घ्या. त्याच्या नंतर त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घ्या. या आमटीला पाच ते दहा मिनीटे उकळवून घ्या. त्याच्या नंतर ही आमटी आहे खाण्यासाठी रेडी.
ही आमटी खायला खूप छान लागते. मला तर खूप आवडते. ही आमटी भगर सोबत खायला खूप छान लागते. साबुदान्याच्या खिचड़ी सोबत सुदधा ही आमटी खूप छान लागते.
Leave a comment