REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

नवीन वर्ष स्वागत गीत

by

in

गतवर्षाला निरोप देण्या,
नाते जोडू प्रेमाचे,
स्वागत करू या नववर्षाचे!
स्वागत करु या नववर्षाचे

सर्वांत शिवसुंदर हे विश्व,
स्वीकारूनी अभिवादन,
नववर्षाच्या पहिल्या,
सूर्योदयाच्या तेजाचे,
स्वागत करू या नववर्षाचे!
स्वागत करू या नववर्षाचे! 

नव्या जगाची आशाकरुनी, सरस्वतीच्या पद्कमली नमन,
करुनी मागू विद्याधन आम्ही,
एक छंद एक ध्यान बुद्धीमंतेचे,
स्वागत करु या नववर्षाचे!
स्वागत करु या नववर्षाचे!

गतवर्षाला निरोप देण्या,
नाते जोडू प्रेमाचे,
स्वागत करू या नववर्षाचे!
स्वागत करू या नववर्षाचे!


Leave a comment