सर्वप्रथम साहित्य :- बेसन पीठ, हळद, मिरची पावडर, कोथिंबीर, मीठ, कांदा, आल, लसूण, धने, खसखस, खोबरा.
कृती : – वाटीभर बेसन पीठ घ्या. त्याच्यात थोडी हळद, थोडी लालमिरची पावडर व अंदाजानुसार मीठ टाका. हे मिश्रण भाजीच्या चमचा एवढे पाणी घेऊन भिजवा. जास्त पाणी टाकू नका. जास्त पाणी टाकले तर पातळ होईल. लहान चमचा एवढे तेल घेऊन तेलाचा हात लावत पिठाचा गोळा तयार करून झाकून ठेवा.
त्या नंतर थोडीशी खसखस, थोडा खोबऱ्याचा किस, थोडे धने, छोटा अदरकचा तुकडा, ४ ते ५ लसूण पाकळ्या, दोन कांदे या सर्वांची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या. हे सर्व झाल्यानंतर गॅस ऑन करून पातेलं गॅसकर ठेवा. पातेल्यात तेल टाका . तेल तापल्यावर मिक्सर मध्ये बारीक केलेल मसाल्याच मिश्रण टाका. त्यानंतर थोडी हळद, थोडी मिरची पावडर व थोड अंदाजानुसार मीठ टाका. मसाल्याला तेल सुटल्यानंतर एक दीड ग्लास पाणी टाका. पाणी उकळेपर्यंत बेसनाच्या पीठाच्या गोळ्याचे शंकरपाड्याच्या आकाराचे तुकडे कापून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर बेसनाच्या पीठाच्या पाटोळ्या टाकून घ्या. १० ते १५ मिनिटां नंतर गॅस बंद करून घ्या. झाली आपली भाजी खाण्यासाठी आहे रेडी. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
Leave a comment