सर्वप्रथम साहित्य :- आलं, लसून, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, पाणी, मूगडाळ.
कृतीः सर्वप्रथम मूगाच्या डाळीला कमीत कमी १ घंट्यासाठी भिजत ठेवा. मूगडाळ १ घंटा भिजून झाल्यानंतर मिक्सरचा भांडा घ्या. मिक्सरच्या भांड्यांत आलं, लसून, हिरवी मिरची, मूगडाळ, मीठ टाकून घ्या. याच्यात एक लहान चमचा एवढे पाणी टाकून दरदरा म्हणजे थोड जाडसरं बारीक करून घ्या. कढीला उकळी आली की ह्या बारीक केलेल्या मूग डाळीचे लहान-लहान गोळे करून कढीमध्ये सोडायचे. हे गोळे टाकल्या नंतर कढीला १० ते १५ मिनटे उकळू दयायचे. ह्या गोळ्यांना जोपर्यंत कढी शिजत नाही तोपर्यंत हलवायचे नाही, नाही तर गोळे तुटतील! कढीला १५ मिनिटा नंतर छान उकळी सुटल्यानंतरच गोळे हलवून घ्यायचेत. आता गॅस बंद करून घ्या. झाले आपले कढी गोळे आहेत खाण्यासाठी रेडी. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. माझ्या या रेसिपीला लाईक करा व शेअर करा.
धन्यवाद!
Leave a comment