सर्वप्रथम साहित्य :- बेसन पीठ, ताक किंवा दही, हळद, जिरा, लसून, आलं, हिरवी मिरची, कोथिंबिर, मीठ, तेल, पाणी, कडीपत्ता .
कृती :- सगळ्यात अगोदर हिरवी मिरची, आलं व लसूण यांची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या. नंतर बेसन पीठ, हळद, ताक, मीठ हे सर्व मिश्रण एकत्र करून दाळ घोटनीने घोटून घ्या. नंतर घोटलेल्या मिश्रणांत मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट टाकून दाळ घोटनीने घोटून घ्या. त्या नंतर गॅस ऑन करा. गॅस ऑन केल्यानंतर गॅस वर पातेलं ठेवा. पातेल्यात तेल टाका. तेल तापल्यानंतर चिमूटभर जिरा टाका. जिरा ब्राऊन झाल्यानंतर कडीपत्ता टाका. यानंतर पातेल्यात घोटलेलं ताकाच मिश्रण टाका. मिश्रणाला १० ते १२ मिनिटांपर्यंत उकळी येईतोवर गॅस चालू राहू द्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. झाली आपली कढी खाण्यासाठी आहे रेडी. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. कढी ही तर माझी सर्वांत आवडती आहे. जास्त साहित्यही लागत नाही व झटपट बनते. मी तर कढी फस्त करण्यात एक्सपर्ट आहे. माझ्या या रेसिपीला लाईक करा व शेअर करा. धन्यवाद!
Leave a comment