सर्वप्रथम साहित्य :- चना डाळ, पालक, मिरची पावडर, गोडा मसाला, आलं-लसूण पेस्ट, मिठ, पाणी, तेल, हळद, शेंगदाणे, कोथिंबीर.
कृती :- सगळ्यात अगोदर चना डाळ निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व १५ मिनिटांकरीता पाण्यात मूरायला ठेवा. त्यामुळे चना डाळ छान नरम होईल. याच प्रमाणे शेंगदाणे पण १० मिनिटां करिता पाण्यात ठेवा म्हणजे ते छान नरम होतील. यानंतर पालक पाण्याने स्वच्छ धुवून चिरून घ्या. नंतर पाण्यात भिजवलेली चना डाळ १ ग्लास पाणी टाकून कुकरमध्ये ३ शिट्या लावून शिजवून घ्या. त्या नंतर मिक्सर मध्ये आलं-लसूण पेस्ट करून घ्या. या नंतर गॅस ऑन करा. गॅसवर पातेलं ठेवा. पातेल्यात तेल टाका. तेल तापल्यावर आलं-लसणाची पेस्ट टाका. आलं-लसणाची पेस्ट ब्राऊन झाल्यानंतर मिरची पावडर, हळद, गोडा मसाला, शेगदाणे हे सर्व साहित्य टाका. हे सर्व टाकल्यानंतर चिरलेली पालक टाका. त्यानंतर कुकरमध्ये शिजवलेली चना डाळ टाकून घ्या. त्यानंतर लागेल तेवढं आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्या. यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात मीठ लागत असेल तेवढ मीठ टाकून घ्या. १५ मिनिटांपर्यंत डाळ-पालक ला छान उकळी येईतोवर शिजवून घ्या. झाली आपली डाळ-पालक आहे खाण्यासाठी रेडी. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
भातासोबत तर ही डाळ-पालक खूप छान लागते. तसे तर पोळीसोबत सुद्धा डाळ-पालक चवीला फार छान लागते. डाळ-पालक मध्ये लिंबू टाकून खाल्ले तर चवीला अतिशय टेस्टी लागते. माझ्या या रेसिपीला लाईक करा व शेअर करा.
धन्यवाद!
Leave a comment