सर्वप्रथम साहित्य :- बटाटे, तांदूळ, तेजपत्ता, मिरची पावडर, हळद, तेल, पाणी, मीठ, वटाण्याच्या ताज्या शेंगा, फुलगोबी, खोबरा, लसून, आलं, जिरा, गोडा मसाला, कोथिंबीर.
कृती :- सगळ्यात अगोदर वटाण्याच्या ताज्या शेंगा सोलून वटाण्याचे दाणे काढून घ्या. त्यानंतर खोबरा, जिरा, आलं, लसूण या सर्व साहित्यांची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. यानंतर फुलगोबी चिरून साफ करून पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. आता गॅस ऑन करुन गॅसवर पातेलं ठेवा. पातेल्यात आवश्यकतेनुसार तेल टाका. आता यामध्ये एकदोन तेजपत्ता टाका.
तेल तापल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला टाका. नंतर मिरची पावडर, हळद, गोडा मसाला टाका. यानंतर मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत व मसाला ब्राऊन होईपर्यंत दोन बटाटे चिरून स्वच्छ धुवून घ्या. मसाला ब्राऊन झाला की त्याच्यात आपल्या अंदाजानुसार शिजण्यासाठी पाणी टाकून घ्या. यानंतर तांदूळ निवडून पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. यानंतर धुतलेले तांदूळ व चिरलेले बटाटे पातेल्यात टाकून घ्या. नंतर साफ केलेली फुलगोबी पण त्याच्यात टाका व सोललेले वटाणेपण त्याच्यात टाकून घ्या. याच्यात आता आपल्या आवश्यकतेनुसार मीठ टाकुन घ्या. २० मिनिटांपर्यंत पाण्याला उकळी येईपर्यंत आलू-भाताला छान शिजवून घ्या. झाला आता आपला आलू-भात आहे खाण्यासाठी रेडी. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
माझ्या या रेसिपीला लाईक करा व शेअर करा.
धन्यवाद!
Leave a comment