भाग-२        

वडिलांनी आयटीया केला होता. घरचा रेडिओ त्यांनी स्वतःच बनवला होता.

त्यांचे इलेक्ट्रिक मध्ये काहीनाकाही इन्वेंशन टाइप चालू असायच! नोकरी करत असल्यामुळे त्यांना अस काही करायला वेळ मिळत नव्हता.

तेव्हा मी लहान होते, शाळेत शिकत होते. मी पण वडिलांसारखी अभ्यासात हुशार होती. एकदा वाचलेले माझे पूर्ण लक्षात रहायचे. कदाचित आमच्या वंशानुगत तो वारसा चालत आलेला असेल? म्हणून तो गुण माझ्यात आलेला असेल! माझा क्लासमध्ये पहिला तर नाही, पण दूसरा किंवा तिसरा क्रमांक तर यायचाच ! टीचर ने प्रश्न विचारले असता, ‘उत्तर देण्यासाठी माझा हात नेहमी वरती असायचा’.

परंतु गणितामध्ये मी थोड़ी कच्ची होते. माझ्या डोक्यात गणिताच्या सिद्धता पद्धती काही समजायचे नाही. कारण मला गणित शिकविणारे जे सर होते ते चांगल्या प्रकारे समजावून सांगत नव्हते. त्यामुळे ज्याला गणित चांगल्या प्रकारे येत असेल, त्यालाच ते समजेल.
बाकीच्यांना काही ते समजेल नाही. मला ट्युशन पण नव्हती. दूसरी मूले शाळेत, नाहीतर बाहेर कुठे ना कुठे ट्युशनला जायची. आमची घरची परिस्थिती तशी नव्हती. घरात आई-वडिलांचे खूप वाद व्हायचे. भांडण व्हायची. त्यामुळे अभ्यास व त्याच्यात ट्युशन हे मी करूच शकत नव्हते.

वडिलांचे म्हणने होते कि, तुम्हाला ट्युशन कशाला पाहीजे. ट्युशन म्हणजे एकप्रकारे चिटींग आहे. तुम्हाला शिकायच असेल तर तुमच्या डोक्यानी समजेल तसा अभ्यास करा. नाहीतर शिकू नका.
यामुळेच गणितामध्ये कच्चे असण्याच्या कारणांनी माझा पहिला क्रमांक यायच्या जागी दूसरा किंवा तिसरा क्रमांक यायचा.

शाळेत जायचे तेव्हा वडिल म्हणायचे, कशाला शाळेत जाता, कशाला शाळा शिकता, खूप उद्धार करणारेय तुम्ही? पोरी तर आहात तुम्ही! तुम्हाला कोणती शिक्षणाची गरज! तुम्हाला थोड़ी मोठे झाल्यावर पोरांसारखी नोकरी करायचीय.

ज्या घरात आई-वडिलांचे सतत वाद भांडण-तंटा होतात, त्या मुलांचे जगणे हे त्यालाच समजते, अशा परिस्थितीत जे वाढलेले असतात.

तसे तर, ‘भांड्याला भांड लागते’अशी एक म्हण आहे. भांडण ही सगळ्यांच्य घरात असतात. फरक
फक्त एवढा असतो, कि कोणाच्या घरात भांडणाचे प्रमाण अत्यल्प असते तर कोणाच्या घरात जास्त! अशा परिस्थितीत शिक्षण होणे पण खूप अवघड असते. मला तरी असे वाटते किंवा माझे मत आहे, अशी परिस्थिती ज्यांच्या घरात असेल त्यांचे शिक्षण हे अधूरे राहत असेल.

कारण आपल्या भारतीय हिंदू धर्मांची ही संस्कृतिच आहे कि पतीकडून कितीही पत्नीचा छळ झाला तरी तो पत्नीने सहन करायचा. एकदा मुलीचे लग्न झाले कि नवऱ्याचे घर हेच तिचे शेवटचे घर. अशा परिस्थितीत आई-वडिलही त्या आपल्या मुलीला काही मदतही करत नाहीत व घेऊनही जात नाहीत. स्त्रीने मरेपर्यंत आपलं जीवन नवऱ्याच्या दारातच काढायला हवं.

म्हणे, ‘ही पूर्वापार चालत आलेली आपली हिंदू संस्कृति आहे’.


       


              

Leave a comment

Get the Book

The ultimate guide for creators: strategies, stories, and tools to help you grow your craft.

Be Part of the Movement

Every week, Jordan shares new tools, fresh perspectives, and creator spotlights—straight to your inbox.

← Back

Thank you for your response. ✨

Creator Rising: A Playbook for a Meaningful Creative Life is your guide to building
not only income, but a creative life
worth living.

Inside you’ll find systems for sharing your work, habits that fuel inspiration, and ways to grow without losing
the spark that makes you create in the first place.