REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

by

in

Write about your dream home.

काचेच्या खिडकीतून उजेड दिसला की मी उठते . उठल्यावर सगळ्यांसाठी नाश्ता, चहा बनवते व सगळ्या फॅमिलीला सर्व्ह करते. नंतर मी पण नाश्ता करते. त्यानंतर घरातील झाडझूड पसारा आवरते. मधल्या वेळेत बाहेरून काय सामान आणायचे असेल ते घेऊन येते , नंतर घरी येऊन कपडे धुवून वाळवायला टाकते. त्यानंतर स्वयंपाक करिते. वरण – भात, भाजी – पोळी सगळ्याना जेवण सर्व्ह करते. त्यानंतर मी जेवण करिते. त्यानंतर घरात काय निवड-नावड करायचे असते ते करते. नंतर संध्याकाळी सगळ्या फॅमिली साठी चहा बनविते. संध्याकाळी मी तर चहा घेत नाही. नंतर रात्र झाली की स्वयंपाक करते वरणभात, भाजीपोळी. सगळ्याना जेवण सर्व्ह करते. त्यानंतर मी जेवण करिते . नंतर सगळे भांडू घासून रॅकवर लावून देते. त्यानंतर मी झोपते . झोपताना उद्या सकाळी उठल्यावर काय बनवू याचा विचार करिते.