Are you patriotic? What does being patriotic mean to you?
या जगात मनुष्याने स्वतःच्या देशासाठी या धरतीमाते साठी देशभक्त असायलाच हवे. कारण आपल्याला खूपच सुंदर असा मनुष्य जन्म या मातीवरच मिळतो. याहून दूसरे सुख कोणते? जगाच्या इतिहासात असे किती थोर पुरुष होऊन गेले कि त्यांनी या देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले! तसेच स्त्री सुद्धा यात मागे नाही. गोंड राणी दुर्गावती ही स्त्री असूनसुद्धा शस्त्र उठावयास मागे हटली नाही. ‘ बुंदेलो हरबोलो के मुँ। हमने सुनी कहानी थी। खूब लड़ी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी। झाँसीवाली रानीने तर आपल्या लहानशा बाळाला कमरेला बांधून घोड्यावर बसूनयुद्ध केले. सावित्री बाईफूले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचिला. कारण सावित्री फूले यांना आपल्या देशातील स्त्रियांना शिक्षित करायच होत व अंधश्रद्धे पासून मुक्त करायच होत. काय वर्णावी अशा महान आत्म्यांची कहानी! आपण तर फक्त एक कल्पना आहे.
तसे तर मी म्हणेल कि, शोध लावणारे सायंटिस्ट्स सुद्धा एक प्रकारे देशभक्तच आहे. कारण कि केवढ डोक लावाव लागत व विचार करावा लागतो. प्रॅक्टीकल कराव लागत. तासनतास, दिवस, रात्र या गोष्टीत त्यांना तहान भूक हरपून गुंताव लागत. माझ्यासाठी तर ते सगळ्यात पहिले देशभक्त आहे. त्यांच्यापुढे जग सुद्धा शून्य आहे. कारण शून्यातूनच अस्तित्व निर्माण होत असतं. शून्यातूनच या जगाची निर्मिती झाली.
तर असे आहे माझे आजच्या दिवसाचे प्रॉम्पट ! माझ्या सगळ्या ब्लॉगर्सला मला दिलेल्या सपोर्टबद्दल धन्यवाद! God bless you all.
Leave a comment